Cast validity / what is Gav namuna 14 for cast validity / गाव नमुना 14 म्हणजे काय.

 Cast validity म्हणजेच जात पडताळणी करण्यासाठी बरेच वेळा गाव नमुना 14 मागितला जातो. आपण बाकी documents जसे की शाळा सोडल्याचा दाखला,  जातीचा दाखला, bonafied,  इत्यादी कागदपत्र जोडून जात पडताळणी साठी प्रकरण सादर करतो त्यावेळी मात्र गाव नमुना 14 पाहिजे असे आपल्याला सांगितले जाते. 

आपल्याला बाकी सर्व माहिती असतेच पण गाव नमुना 14 म्हणजे काय , तो कसा काढायचा?, त्या साठी अर्ज कसा करायचा? गाव नमुना 14 किती दिवसात मिळतो? आणि हा गाव नमुना 14 नक्की कोण issue करतो आणि त्यात काय माहिती असते? हे सर्व या ब्लॉग मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.  माहिती आवडली तर ब्लॉग च्या comment बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया नक्कीच द्या. 

1) गाव नमुना 14 साठी आपल्या तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात जावे लागेल. 

2) गाव नमुना 14 म्हणजे जन्म नोंद वहिचा उतारा म्हणायला काही हरकत नाही. एका वर्षाचे एक रजिस्टर असे 1940 पासूनची प्रत्येक गावाचे जन्म रजिस्टर तालुका तहसीलदार कार्यालयात record room मध्ये उपलब्ध असतेच.

 गावाचे नाव आणि पूर्ण नाव आणि सर्वात महत्त्वाची जन्म तारीख अणि वर्ष व्यवस्थित रित्या आपल्या अर्जात लिहावे. म्हणजे उतारा शोधायला जास्त वेळ लागत नाही. 

  जात जात पडताळणी करण्यासाठी काही जातीसाठी 1967 साला पूर्वीचा जातीचा पुरावा सादर करावयाचा असतो.  आणि हा पुरावा गाव नमुना 14 च्या रजिस्टर मध्ये तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात उपलब्ध असतो. 

3) गाव नमुना 14 काढावयाचा असल्यास तहसीलदार कार्यालयात नोंद विभागात खालील नमुन्यात एक अर्ज द्यावा. अर्जावर 10/- रुपयाचा कोर्ट फी स्टँप चिकटवा ( 10/- कोर्ट फी स्टॅम्प तहसीलदार कार्यालया बाहेरील  झेरॉक्स सेंटर मध्ये मिळतो) आणि त्याची 1 झेरॉक्स करून घ्या म्हणजे झेरॉक्स कॉपी आपल्याकडे पोच राहू शकते.

अर्जाचा नमुना असा आहे  :-

पेपर च्या वरील उजव्या कोपर्‍यात अर्जदाराचे नाव, पत्ता,  दिनांक आणि मोबाईल नंबर. 

डाव्या कोपर्‍यात 10/- चा कोर्ट फी स्टॅम्प. 

प्रती, 

माननीय तहसीलदार साहेब, 

तहसीलदार कार्यालय,

तालुका-          जिल्हा-

               विषय :-  गाव नमुना 14 ची प्रत मिळणे बाबत.

माननीय महोदय, 

मला माझ्या मुलीच्या / मुलाच्या पुढील शिक्षणासाठी जात पडताळणी प्रक्रियेसाठी गाव नमुना 14 ची आवश्‍यकता आहे. 

सदर कामासाठी आपले कार्यालयातून गाव नमुना 14 ची साक्षांकित प्रत मिळावी,  या कामासाठी अर्ज सादर केला.

गाव नमुना 14 ची प्रत खालील नावाने मिळावी:-

वडिलांचा जन्म 1967 पूर्वी झाला असल्यास त्यांचे पूर्ण नाव जन्म 1967 नंतर चा असल्यास आजोबांचे पूर्ण नाव :-

गावाचे नाव व तालुका :-

जन्मतारीख:-

मृत्यू झाला असल्यास मृत्यू तारीख :-

जात व पोटजात :-

सोबत चुलते / आत्या यांची पूर्ण नावे अणि जन्म तारीख माहीत असल्यास लिहावी.

कळावे,

आपला विश्वासू. 

(सही व नाव)







Comments