Posts

Cast validity / what is Gav namuna 14 for cast validity / गाव नमुना 14 म्हणजे काय.

 Cast validity म्हणजेच जात पडताळणी करण्यासाठी बरेच वेळा गाव नमुना 14 मागितला जातो. आपण बाकी documents जसे की शाळा सोडल्याचा दाखला,  जातीचा दाखला, bonafied,  इत्यादी कागदपत्र जोडून जात पडताळणी साठी प्रकरण सादर करतो त्यावेळी मात्र गाव नमुना 14 पाहिजे असे आपल्याला सांगितले जाते.  आपल्याला बाकी सर्व माहिती असतेच पण गाव नमुना 14 म्हणजे काय , तो कसा काढायचा?, त्या साठी अर्ज कसा करायचा? गाव नमुना 14 किती दिवसात मिळतो? आणि हा गाव नमुना 14 नक्की कोण issue करतो आणि त्यात काय माहिती असते? हे सर्व या ब्लॉग मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.  माहिती आवडली तर ब्लॉग च्या comment बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया नक्कीच द्या.  1) गाव नमुना 14 साठी आपल्या तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात जावे लागेल.  2) गाव नमुना 14 म्हणजे जन्म नोंद वहिचा उतारा म्हणायला काही हरकत नाही. एका वर्षाचे एक रजिस्टर असे 1940 पासूनची प्रत्येक गावाचे जन्म रजिस्टर तालुका तहसीलदार कार्यालयात record room मध्ये उपलब्ध असतेच.  गावाचे नाव आणि पूर्ण नाव आणि सर्वात महत्त्वाची जन्म तारीख अणि वर्ष व्यवस्थि...